सर्वेश सागवेकर ,प्रणव करंजे ,कुणाल सागवेकर यांच्या नौकेने पटकावला प्रथम क्रमांक
जैतापूर (वार्ताहर): मिशन सागर अंतर्गत नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बिगर यांत्रीकी नौका स्पर्धेत सागवे येथील सर्वेश सागवेकर , प्रणव करंजे ,कुणाल सागवेकर यांच्या नौकेने पटकावला प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्या सारंगचा राजा या अंतर्गत राजापूर तालुक्यातील सागवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कातळी जेटी येथे 31 डिसेंबर रोजी बिगर यांत्रिकी नौका ( पगार) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .
राजापूर तालुक्यातील कातळी जेट्टी ते आंबेरी पूल व परत या जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या मार्गावर ही स्पर्धा संपन्न झाली .या स्पर्धेमध्ये परिसरातील जवळपास 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या या स्पर्धेमध्ये सर्वेश सागवेकर, प्रणव करंजे ,कुणाल सागवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला रईस सोलकर, सियान सोलकर, इसरार मिरकर यांनी द्वितीय क्रमांक तर शागीर मंचेकर, अज्जत मंचेकर ,मेहबूब सोलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक साठी रोख 3000/-, 2000/- आणि 1000/- बक्षिसांसह आकर्षक चषक आणि पोलीस दलाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी, सागवे सरपंच सोनाली टूकरूल उपसरपंच मंगेश गुरव, कातळी गाव अध्यक्ष नौशाद वाडकर, कातळी सोसायटी अध्यक्ष सुलेमान सोलकर, जुनेद मुल्ला,नरेश सागवेकर, राजापूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, पत्रकार राजन लाड, सुप्रसिद्ध यू ट्युबर राहिद सोलकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम सोलकर ,शागीर मंचेकर, मुराद बोरकर, जुनेद मुल्ला ,नाटे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राकेश बागुल, पोलिस शिपाई सुनील गांगुर्डे ,किरण जाधव ,दिगंबर ठोके,नरेश ठीक,प्रणेश गुगधडी यांसह कातळी सागवे येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी मेहनत घेतली . स्पर्धा यशस्वी करणाऱ्या आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अविनाश केदारी यांनी आभार मानले आहेत.
———————————————————–