प्रकल्प दुरीकडे गेला म्हणून बोंबा मारणाऱ्या आ. वैभव नाईक यांनी मतदार संघात कोणते प्रकल्प आणले ते जनतेला सांगावे
संजय राऊत यांनी पाणबुडी या विषयावर बोलू नये कारण पानपट्टी, पानटपरी हेच विषय मर्यादित
मालवण | प्रतिनिधी : पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राचा महाराष्ट्रात आहे, गुजरातचा गुजरात मध्ये होणार. पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमारिन प्रकल्प जिथे जिथे किनारा आहे तिथे होऊ शकतो. असे सांगत या प्रकल्प विषयावर टीका टिपण्णी करून राजकारण करणाऱ्या आ. वैभव नाईक, खा. संजय राऊत यांच्यावर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार प्रहार केला आहे.
निलेश राणे म्हणाले पाणबुडी प्रकल्प जो वेंगुर्ला मध्ये 2017 या वर्षी मंजूर झाला होता. काही लोकांना शंका वाटते तो गुजरातला गेला की काय? पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमारिन प्रकल्प जिथे जिथे किनारा आहे तिथे होऊ शकतो. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक अन्य किनारपट्टी राज्यात होऊ शकतो. मात्र महाराष्ट्र रद्द झाला आणि गुजरातला गेला हे खोटे आहे. गुजरातने गुजरताचा केला असेल. मात्र आपल्या राज्याचा आपला राज्यात होणार.
मात्र या प्रकल्प बाबत भाष्य करणारे आमदार वैभव नाईक यांना विचारायचे आहे? हा प्रकल्प वेंगुर्ला येथे होणार आहे. म्हणजे तुमच्या मतदारसंघा बाहेर होतोय. तो वेंगुर्ला या ठिकाणी आहे तसा प्रस्तावित होणारच. मात्र 9 वर्षात तुमच्या मतदार संघात कोणते प्रकल्प आणले हे जनतेला सांगा. असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनीही या प्रकल्पवर टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणबुडी या विषयावर बोलू नये पानटपरी, पानपट्टी हेच विषय तुझ्यासाठी मर्यादित आहेत. असा टोला निलेश राणे यांनी लागावला