पाली तिठा येथे पोलिसांची कडक नाकाबंदी

पाली | वार्ताहर

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा व रत्नागिरी नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाली तिठा येथे पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांच्या नाकाबंदीमुळे दारू पिऊन गाडी चालवणे, हुल्लडबाजी करणे, तसेच गोव्याहून होणारी अवैध चोरट्या मद्याच्या वाहतुकीला आळा बसणार आहे.

या नाकाबंदी वेळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, संतोष कांबळे, होमगार्ड अजय गोसावी, विजय सरफरे, सोनाली शिवगण हे चोख भूमिका निभावत आहेत.