रत्नागिरी : येत्या २२ जानेवारी अयोध्येच्या श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण असून, २२ जानेवारीला घरोघरी रामज्योत पेटवून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ५००हून अधिक वर्षांच्या संघर्षानंतर श्रीराम मंदिर उभे राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराने यंदाचा महोत्सव ‘आले रामराज्य अर्थात राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ या विषयावर आयोजित केला आहे. १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात हा महोत्सव होणार असून, त्याच्या सन्मानिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भारतीय बैठक सर्वांसाठी मोफत आहे. पितांबरी उद्योग हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. (सन्मानिकांच्या उपलब्धतेची माहिती बातमीच्या शेवटी दिली आहे.)
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुश्राव्य आवाजात रामकथा, त्याच्या जोडीला अजरामर संगीत कलाकृती असलेल्या गीत रामायणातील काही निवडक गाणी आणि पाचव्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा – गीतरामायण – कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभू श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे. रामकथा सांगत असताना आफळेबुवा श्रीराम मंदिराच्या उभारणीचा संक्षिप्त इतिहासही उलगडून सांगणार आहेत. तसेच ५००हून अधिक वर्षांच्या संघर्षाचे फलित असलेल्या अयोध्येतील भव्य राममंदिराचा देखावा हे यंदाच्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. ३२ फूट लांब, २० फूट रुंद आणि १५ फूट उंचीच्या भव्य व्यासपीठाच्या पाठीमागे सुमारे १२ फूट उंच आणि २४ फूट लांब अशा भव्य आकाराचा राममंदिरचा सुंदर देखावा उभारण्यात येणार आहे. रत्नागिरीतीलच प्रसिद्ध रांगोळीकार, चित्रकार राहुल कळंबटे यांनी हा देखावा साकारला आहे. या देखाव्यात प्रभू श्रीरामांचा आठ फूट उंच पूर्णाकृती कटआउटदेखील असेल.
गीतरामायण कार्यक्रमात गायक अभिजित पंचभाई यांना सौ. दीप्ती कुलकर्णी (सिंथेसायझर), प्रसाद करंबेळकर (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), मनोज भांडवलकर (मृदुंग) या कलाकारांची साथसंगत असेल.
कीर्तनसंध्या समूहातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष असून, १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव होणार आहे.
यंदाच्या कीर्तनसंध्या उपक्रमात काही विशेष व्यक्तींचे सत्कारही होणार आहेत. लळिताच्या कीर्तनाने पाचव्या दिवशी महोत्सवाची सांगता होईल. ह. भ. प. आफळेबुवा, तसेच ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत यांनी या कार्यक्रमासाठी केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.
कीर्तनसंध्येसाठी भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील.
कीर्तनसंध्या २०२४ देणगी सन्मानिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे
मानस जनरल स्टोअर्स, माळनाका, रत्नागिरी
९०११६६२२२०
धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, मारुती, मंदिर, रत्नागिरी
उमेश आंबर्डेकर – ९४२३२९२४३७
सोहम एन्टरप्रायझेस, माळनाका, रत्नागिरी
नितीन नाफड – ८३०८८१३१५८
गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी, रत्नागिरी
९८९०८२७००६
आगाशे स्टोअर्स आणि आगाशे फूडकोर्ट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
९७३०३१०७९९
श्रीकांत सरदेसाई, रत्नागिरी
९४२११४२४९८
श्रीराम गोडबोले, पावस
९४२१२३८८२४
मकरंद करंदीकर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी
९२८४७६७३७६
रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ,
मेन रोड, रत्नागिरी
९४२२०५२६१३
अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी
अनिकेत कोनकर – ९४२३२९२१६२
महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी
७४१०१०४४३३
पराग गोगटे, केशर अमृततुल्य, जयस्तंभ, रत्नागिरी
९५५२५७०७२४
केळकर उपाहारगृह, अंगण प्लाझा, नाचणे रोड
९४२३०४७३४७
मधुसूदन बेंडे
९४२३८१७५११
राजन पटवर्धन, विष्णुनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
९८६०३६६९९१
गंधराज ,समीर कार्लेकर, मारुती आळी, रत्नागिरी
९७६९२८७१७१
चिन्मय भागवत, नाचणे, रत्नागिरी
८८८८७९८८४५
श्रीनंदन केळकर, पऱ्ह्याची आळी, रत्नागिरी
७०८३९०९१०९
निबंध कानिटकर, कसबा, संगमेश्वर
९४२२३७६३२७
ओमकार बापट, रत्नागिरी
९४२२४३२७६४