लांजा बसस्थानकात फटाके फोडून जल्लोष, विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
लांजा (प्रतिनिधी) एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था रत्नागिरी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आज जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे लांजा डेपो सचिव राजेंद्र पाटोळे हे निवडून आले. त्यांचे लांजा बस स्थानकात रविवारी सायंकाळी ५ वाजता जोरदार स्वागत करण्यात आले.
रत्नागिरी विभाग एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी याची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक शनिवारी ३० डिसेंबर रोजी पार पडली होती .या चुरशीच्या निवडणूकिचा निकाल आज ३१ डिसेंबर रोजी लागला.सन २०२३-२४ ते २०२८-२९ या वर्षासाठी झालेल्या या निवडणुकीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पॅनेल उभे होते. ११ संचालक निवडून आले.या निवडणुकीत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सचिव राजेंद्र महादेव पाटोळे हे विजयी झाले.
राजेंद्र पाटोळे हे सायंकाळी लांजा येथे आले असता त्यांचे फटाके फोडून भव्य स्वागत करण्यात आले .यावेळी पेढा भरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई,राष्ट्रवादी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष बापू जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष शमा थोडगे, शिवसेना ठाकरे गट उपतालुका प्रमुख सुरेश करंबळे ,तालुका संघटक अमोल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संतोष तुळसणकरर,एसटी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.