आसावरी दिलीप भालेकर हिचे प्रथमच प्रयत्नात वैद्यकीय परवाना परीक्षेत यश

Google search engine
Google search engine

देवरुख (प्रतिनिधी )
देवरुखातील आसावरी दिलीप भालेकर हिने रशियातून एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून वैद्यकीय परवाना परीक्षेत प्रथमच प्रयत्नात यश मिळवले आहे.
शालेय शिक्षण देवरुख येथून पूर्ण करून पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण घेण्यासाठी रशियातील तांबोव
मेडिकल स्टेट युनिव्हर्सिटी नेम आफ्टर डेरझावीन रशिया या विद्यापीठात प्रवेश केला. या अभ्यासक्रमासाठी सलग ६ वर्ष आसावरी हिने मेहनत घेतली. कोरोना काळातही न डगमगता तिथेच राहून अभ्यासाला प्राधान्य दिले. अखेर हा अभ्यासक्रम पूर्ण करून २०२३ साली भारतात परतली.
भारतात परतल्यावर विदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झम ही परीक्षा वैद्यकीय परवानासाठी द्यावी लागते.
या परीक्षेत डॉक्टर आसावरी हिने प्रथमच प्रयत्नात यश मिळवले आहे. या परीक्षेत सुमारे ३०,००० परीक्षार्थी पैकी पास झालेल्या ९००० विद्यार्थ्यांमध्ये आपली जागा निश्चित केल्याने डॉक्टर आसावरी हिचे विशेष कौतुक होत आहे.
जिद्दीने यश मिळविणाऱ्या डॉ. आसावरी हिला नगराध्यक्षा सौ मृणाल शेट्ये, भाजपा ओ बी सी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक सुशांत मुळ्ये, राधाकृष्ण सेवाभावी मंडळ देवरूख आणि परिसर मंडळाचे अध्यक्ष श्री वसंत भालेकर तसेच उपाध्यक्ष श्री दिलीपशेठ पागार तसेच सदस्य शशिकांत काबदुले, मदन वाजे, बळीराम भालेकर, अशोक खेडेकर यांनी अभिनंदन केले.
जिद्द आणि आई-वडिलांचा पाठिंबा यामुळेच मी हे यश मिळवू शकले असे डॉ. आसावरी आवर्जून सांगते. नातेवाईक मित्रपरिवार तसेच सर्व स्तरातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.