अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाचा लोकोपयोगी उपक्रम
रत्नागिरी:अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाच्या वतीने आज गोळप येथे मोरवठार आणि पवारवाडी च्या खाली नदीवर बंधारा बांधण्यात आला. चार दिवसांपूर्वी खालच्या बाजूला एक बंधारा बांधला होता.
पाण्याची जमीनीत साठवणूक करणे ही काळाची गरज असून अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाच्यावतीने गेली 5 ते 6 वर्षे गोळप वस्तीमध्ये पाणी टंचाई दूर व्हावी, लोकांमध्ये जागृती व्हावी याकरिता प्रयत्न करत आहे,याला आज लोक सहभागाची साथ मिळत आहे ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन अनुलोम भाग उपविभागप्रमुख व मंडळाचे मार्गदर्शक रवींद्र भोवड यांनी केले.ते पुढे म्हणाले, कोकणात अशाप्रकारचे बंधारे लोकसहभागातून गावोगावी होणे गरजेचे आहे तरच पाण्याचा साठा वाढून खालच्या भागातील विहिरींना पाणी टिकून राहील जेणेकरून भविष्यातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल.
यावेळी मंडळाचे प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य अँड अविनाश काळे म्हणाले की,सातत्याने या भागात मंडळाच्या माध्यमातून पाणी साठवणूक करण्यासाठी अश्या प्रकारचे बंधारे बांधण्याचे काम आणि इतर अनेक उपक्रम सातत्याने केले जातात. हे बंधारे तसेच बाकी अनेक उपक्रम सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत घेतले जातात. लोक एकत्र आले तर अनेक विधायक कामे होऊ शकतात हे मंडळाच्या अनेक उपक्रमातून सिद्ध झाल्याने लोकांचा सहभाग वाढत आहे.
यावेळी अनुलोमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग उपविभाग प्रमुख रवींद्र भोवड, जनसेवा सामाजिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश काळे,सचिव समित घुडे,सहसचिव प्रकाश संते,स्थानमित्र महेश पालकर, संदीप पालकर,अनिकेत आंबेकर, योगेश भोजने, अमोल आंबेकर,वैभव भोजने,सार्थक संते, मीत भोवड, दीपक भोजने, दशरथ नारकर, हरीश पवार, रविन्द्र पवार, अद्वैत काळे, रामदास पवार, नेत्रा खेर, साक्षी पवार,आदिती दामले, आदिती काळे, प्राची पवार,समीक्षा घाणेकर,हितेन पालकर, दुर्गेश खेर आदी उपस्थित होते.