पोयरे एस.टी अपघातातील एस.टी चालकाचे निधन

अपघात प्रकरणी त्याचावर गुन्हा दाखल

देवगड | प्रतिनिधी : पोयरे एस.टी अपघातातील जखमी एस.टी चालकाचे जिल्हा
रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.या अपघातप्रकरणी देवगड
पोलिस स्थानकात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
शनिवारी दुपारी २.वा.सुमारास आचरा येथून खुडी मार्गे जाणाèया आचरा देवगडगाडीला पोयरे गोदापूर स्टॉप येथे अपघात
झाला.एस.टी चालकाचेगाडीवरील नियंत्रण सुट ल्या ने गाडी रस्ता
सोडू न तेथिल संजय भगवान चव्हाण यांच्या घरावर धडकली.

हा अपघात दुपारी २.३० वा.सुमारास घड ला.या अपघातात चालक बापू
लक्ष्मण काळे(५५) रा.तळेरे हा गंभीर जखमी झाला होता तर वाहक
राजेंद्र मनोहर जाधव याच्यासहीत दोन प्रवाशांना किरकोळ
दुखापत झाली होती त्यांना उपचारासाठी आचरा प्राथमिक
आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.

या अपघातात गंभीर दुखापत झालेले चालक बापू काळे यांचे
शनिवारी सायंकाळी ओरोस जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान
निधन झाले.देवगड पोलिस स्थानक या अपघातप्रकरणी वाहक राजेंद्र
मनोहर जाधव यांनी दिलेल्या फीर्यादीनुसार चालक बापू लक्ष्मण
काळे यांनी आपल्या ताब्यातील एस.टी बस आचरा ते देवगड अशी नेत असताना स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे