टंचाई ग्रस्त गावांना दिलासा मिळण्याची चिन्हे
देवेंद्र जाधव | खेड : ‘नेहमीची येतो पावसाळा ‘ अस पावसा बाबत म्हटलं जातं असत या उक्ती प्रमाणे खेड तालुक्यात मुसळ धार पाऊस पडण्याचे प्रमाण देखील जास्त आहे गतवर्षी देखील पावसाने असाच काहीसा कहर केला धरण क्षेत्रात पाऊस समाधानकारक कोसळल्याने दरवर्षीप्रमाणे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई चे मळभ या वर्षी मात्र दुर होण्याची शक्यता असून तालुक्यातील टंचाई ग्रस्त वाड्याना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत
जिल्ह्यातील पहिला टँकर धावण्याची परंपरा म्हणून खेड तालुक्या कडे पाहिले जाते सर्वाधिक पाणी टंचाई चा दाह हा सह्याद्रीच्या कडे कपारीत वसलेल्या धनगर वाड्याना बसत असतो आणि हे चित्र गेले अनेक वर्षे कायम राहिले आहे शासन स्तरावर जल जीवन मिशन ही योजना देखील टंचाई ग्रस्त गाव वाड्या मध्ये प्रामुख्याने राबवली जात असल्याने काही अंशी अशा टंचाई ग्रस्त वाड्या पाणी आराखड्यात न याव्यात अशीच आता अपेक्षा व्यक्त होत आहे
खेड तालुक्यात १० मार्चपासून पाण्याचा।पहिला टँकर धावू लागला. पोसरे बुद्रुक- सडेवाडी येथीलग्रामस्थांनी सर्वप्रथम टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली होती. यानंतर एकामागोमाग एक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. अन गत वर्षी बघता बघता ३० गावे,६४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा असे चित्र होते
खेड तालुक्यात ऐन शिमगोत्सवातच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या होत्या .
तालुक्यात व जिल्ह्यातील पाण्याचा पहिला टँकर पोसरे बुद्रुक– सडेवाडी येथे १० मार्चपासून धावला यामुळे पहिला टॅंकर धावण्याची परंपरा देखील तालुक्याने कायम ठेवली होती.
एकीकडे पाणीटंचाईने कहर केलेला असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाकडे अवघा एकच शासकीय टँकर उपलब्ध होता. पाणीटंचाईने रौद्ररूप धारण
केल्यानंतर ४ खासगी टँकरची उपलब्धतता करण्यात आली. यामुळे टँकरची प्रतिक्षा करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
तालुक्यात तहानलेल्या गाव-वाड्यांमध्ये शासकीय टँकरच्या १७९ तर खासगी टँकरच्या १५१ अशा ३३० फेऱ्या।एकदिवसाआड धावत होत्या. चोरद नदीपात्रातून लाखो लिटर पाण्याचा उपसा करून ग्रामस्थांची तहान शमवली जात होती.
मात्र गत वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी, कोंडीवली या चार धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट टळणार आहे. याशिवाय धरणातील पाण्याचा वापर उन्हाळी शेतीसाठी करणे शक्य होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गतवर्षी ३६८२ मि.मी. इतका पाऊस पडला. पावसाने सरासरी गाठल्याने चारही धरणामध्ये मुबलक पाणीसाठ आहे. नातूनगर धरणातील पाण्यावर खवटी, नातूनगर, उधळे ग्रामस्थ उन्हाळी पिके घेतात. २८.०८० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात २७.२३० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. शिरवली धरणातून शिरवलीसह सुकिवली, कर्टेल गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. या धरणाची क्षमता ३.३६५ द.ल.घ.मी. असून सद्यस्थितीत २.९०७ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे.
पिंपळवाडी धरणाची क्षमता १६.७० द.ल.घ.मी. इतकी आहे. या धरणात सद्यस्थितीत १५.७६ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. खोपी, मिर्ले, कुंभाड, बिजघर आदी गावांना पिण्यासह उन्हाळी पिके घेण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे.
कोंडीवली धरण परिसरातही समाधानकारक पाऊस पडला आहे. ३.३०६ पाणी साठवण पडला आहे. ३.३०६ पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात ३.२३२ इतका पाणीसाठा आहे. तसेच धरणाला
लागलेल्या गळतीचे कामही पूर्ण झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही मिटणार आहे.