तीन डंपर घेतले ताब्यात
आचरा | अर्जुन बापर्डेकर : अवैध वाळू व्यवसायाविरोधात नवीन वर्षातही पोलीसांची धडक कारवाई सुरु असून सोमवारी पहाटे आचरा पोलीसांनी वाळू वाहतूक करणारया तीन डंपर वर कारवाई करत गुन्हा दाखल करुन तपासासाठी मालवण पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले आहेत.
अवैध वाळू वाहतूकी विरोधात पोलीस कारवाई तीव्र झाली असलीतरी कारवाईला न जुमानता काही वाळू व्यावसायिकांकडून पहाटेच्या सुमारास वाळू वाहतूक निर्धोक सुरु असल्याचे बोलले जात होते. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी या बाबत कडक कारवाई सुरु केली आहे.नविन वर्षाच्या सुरुवातीलाच सोमवारी पहाटे 4.35 वाजण्याच्या सुमारास कोंबींग ऑपरेशन करत मालवण पोलीस ठाणे हद्दीतील तोंडवळी खाडी पात्रातून अवैध वाळू काढून आचरा हद्दीतून विनापरवाना वाळू वाहतूक करत असताना खाजगी गाडीने पाठलाग करत तीन डंपरना ताब्यात घेतले.
यात सचिन तुकाराम जंगले,वय-30 वर्ष रा – पिसे- कामते कणकवली MH-07AJ1115
अजय सदाशिव जाधव वय -40 वर्ष रा – कणकवली शिवाजीनगर MH-07-C-6373
मंजुनाथ चन्नप्पा चव्हाण वय -24 वर्ष रा -कणकवली बँक कॉलनी मुळ राहणार – कक्कळ मेली ता- सिंदगी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक MH-07-AJ-9991 यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वाळू चोरी मालवण हद्दीतील असून आचरा पोलिस ठाणे येथे 3 वाळू चोरीचे गुन्हे दाखल करून तपासकरीता मालवण पोलिस ठाणे येथे पाठविण्यात आले असल्याचे आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सांगितले
सदर कारवाई पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले,उपविभागीय पोलीस अधिकार आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी केली.या कारवाईत आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महेश देसाई, मिलिंद परब आदी सहभागी झाले होते.