मंडणगड | प्रतिनिधी : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबीर’ दि. २४ ते ३० डिसेंबर दरम्यान तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत पाट येथे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मंडणगड तालुक्याचे नायब तहसीलदार सीमा पुजारी, मंडणगड पोलिस निरीक्षक तुळशीराम सावंत, आंबडवे उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ. आसिफ खान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर अॅड. सौ.सोनल सचिन बेर्डे नगराध्यक्ष मंडणगड, श्री. वैभव कोकाटे उपनगराध्यक्ष मंडणगड, सौ. प्रियंका दिनेश लेंडे नगरसेविका मंडणगड, महाविद्यालयाचे सहा.प्रा. मंगेश ठसाळे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पाट ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. सुषमा दिवेकर, उपसरपंच श्री. सचिन चिले, ग्रामसेवक सौ. गितांजली शिंदे, पोलिस पाटील श्री. नथुराम दिवेकर तसेच सुर्ले गावचे अध्यक्ष रमेश शिंदे, सतीश दिवेकर, प्रवीण मोहिते, सुहास महाडीक व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पाट आदी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा सांगता समारंभ संपन्न झाला.
शिबीर कालावधीत व्यक्तिमत्व विकास व समाज प्रबोधन, ग्रामस्वच्छता, रस्ते-दुरूस्ती, आपत्कालीन व्यवस्थापन, जलसाक्षरता- वनराई बंधारा, सार्वजनिक आरोग्य जाणीव-जागृती, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, आपतकालीन व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान मंडणगड पोलिस निरीक्षक श्री. तुळशीराम सावंत (सायबर क्राईम आणि विद्यार्थी), युवा लेखक मंडणगड श्री. भा. ला. लुटे (मराठी साहित्य), मंडणगड पत्रकार संघ (ग्रामीण पत्रकारीता), डॉ. श्रीधर बाम (भारतीय वैद्यकीय शास्त्र), एस. टी. आगार प्रमुख मंडणगड श्री. सतीश पाटील (एस. टी. महामंडळाचे अंतरंग), श्री. राजेश संमेळ (भारतीय लोकशाही आणि धर्म), श्री. दयानंद कांबळे (भारतीय न्यायव्यवस्था) तसेच ‘गुंज’ या एन.जी.ओ. चे रत्नागिरी रायगडचे समन्वयक श्री. विजय दुर्गवले (‘गुंज’ या एन.जी.ओ) आदी विविध विषयांतील तज्ञ मान्यवर यांचे शिबिरार्थीना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिर कालावधीमध्ये उल्लेखनीय कार्य करून अन्य स्वयंसेवकांसमोर आपला आदर्श ठेवणार्या काही स्वयंसेवकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक शुभम किजबिले, तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका कु. कोमल पवार तसेच सर्वोत्कृष्ट ग्रुप लीडर वैभवी चोगले, त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट ग्रुप म्हणून रायगड ग्रुप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी सात दिवसामध्ये आलेले विविध अनुभव आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले.
शिबिरातील सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.दिपक रावेरकर, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी तसेच बी.एम.एस.विभागाचे प्रमुख सहा.प्रा. अमोल राजेशिर्के, सहा.प्रा. मंगेश ठसाळे, सहा.प्रा. अरुण ढंग, ग्रंथपाल दिगंबर हेमके, अमोल सकपाळ व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शिबिरार्थी सर्व स्वयंसेवक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.