अनंत नवगरे यांना नाथपंथी गोसावी समाजभूषण पुरस्कार जाहीर

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : नाथपंथी गोसावी समाजाचे वतीने देण्यात येणारा समाजभुषण पुरस्कार पालवणी येथील ग्रामस्थ अनंत नवगरे यांना देण्यात आली. पालवणी गोसावीवाडी येथे नाथपंथी गोसावी समाजाचे ४२ वे आधिवेशन नुकतेच पार पाडले. या वेळेस समाजातील विवीध गावातुन व मुबंईहुन नाथपंथी गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोसावी समाजाचे अध्यक्ष अनंत मंडपे यांनी पालवणीचे सुपुञ अनंत नवगरे यांना नाथ पंथी गोसावी समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे यावेळी घोषीत केले. अनंत नवगरे यांना या वर्षीचा ‘समाजभूषण पुरस्कार’ वितरणाचा सांस्कृतीक कार्यक्रम श्रीकृष्ण हॉल दादर पुर्व येथे देण्याची घोषणा करण्यात आली. अनंत नवगरे यांनी १९९९ ते २००३ पर्यंत नाथपंथी गोसावी समाजाचे अध्यक्ष पदावर काम करुन समाजाला शैक्षणिक आर्थिक दृष्टीने प्रगती पथावर नेण्याचे विषेश कार्य भुषविले होते. यासारख्या अनेक कामांबाबत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.