हिंदू संस्कृती जपण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वारकरी एकत्र येतात हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – ह.भ.प. गवंडळकर

सिंधुदुर्ग : १३ व्या शतकापासून वारकरी संप्रदायची परंपरा असुन आपली असणारी हिंदू संस्कृती चा प्रचार व संस्कृती जपण्याचे काम वारकरी संप्रदाय करत आहे.त्यांचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व वारकरी एकत्र येतात हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद व भूषणावह आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा जिल्हा वारकरी मेळावा दोडामार्ग येथे संपन्न झाला त्यावेळी वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष मा. ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले ३१ डिसेंबर असताना व बाजूला हाकेच्या अंतरावर गोवा राज्य आहे परंतु याच दिवशी दोडामार्ग येथे मेळावा व्हावा ही आग्रही मागणी दोडामार्ग येथील वारकरी बांधवानी केली व मेळावा यशस्वी केला.हिंदू धर्म व हिंदू संस्कृती वारकरी संप्रदायाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले व जिल्हा वारकरी मेळावा यशस्वी केल्याबद्दल दोडामार्ग तालुका वारकरी संप्रदायाचे आभार मानले. तर गणेशप्रसाद गवस यांनी वारकरी संप्रदायास लागणारे सर्व सहकार्य असे आश्वासन दिले

मेळाव्यातील प्रमूख ठराव –

१) वृद्ध कलाकार मानधन जिल्हा कमितीवर वारकरी प्रतिनिधी घ्यावा

२)सिंधुदुर्गनगरी येथे वारकरी भवन व्हावे

३)पंढरपूर येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी भवन होण्यासाठी शासकीय कोट्यातून जमीन मिळवी

वारकरी मेळाव्यामुळे संपूर्ण दोडामार्ग शहर भक्तीमय झाले होते. सकाळी १० वाजता दत्त मंदिर येथुन वारकरी दिंडीला सुरुवात झाली. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल या घोषणा सह राम कृष्ण हरि जप करत टाळ मृदंगाच्या तालावर अभंग म्हणत हजारोच्या संख्येने वारकरी तल्लीन होत सहभागी झाले होते त्यामुळे बाजाराचा दिवस असूनही संपूर्ण दोडामार्ग शहर भक्तिमय झाले होते.

मेळाव्यात दोडामार्ग तालुक्यातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. वारकरी दिनदर्शिका प्रकाशन शिवसेना(शिंदे)दोडामार्ग तालुकाप्रमुख श्री गुरुप्रसाद गवस यांचे हस्ते करण्यात आले तर वारकरी संप्रदायातीळ मानाचा संतसेवा पुरस्कार ह. भ. प. मदन रामचंद्र कुंदेकर कसई दोडामार्ग ह. भ. प. उत्तम बापू पेडणेकर शिरशिंगे सावंतवाडी यांना जिल्हा अध्यक्ष मा. ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज हस्ते देण्यात आले.

तर पोलीस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी दोडामार्ग यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या

यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष ह.भ.प रामचंद्र कदम, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, सचिव श्री राजू राणे, संचालक विलास राणे, भालचंद्र पवार, एस के सावंत, मदन कुंदेकर, गणेश गवस, अमरिश गवस, रामचंद्र गाड, भगवान राऊळ तसेच जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने वारकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीप गवस व सचिव राजू राणे यांनी केले.