गोठणे दोनिवडे येथील तुकाराम चिपटे यांचे निधन

 

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील गोठणे दोनिवडे मठवाडी येथील ग्रामस्थ तुकाराम भिकाजी चिपटे (८५) यांचे गुरूवार २८ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

जुन्या काळातील ते प्रसिध्द लाकूड चिरकाम करणारे होते. त्यामुळे ते परिसरात सर्वश्रुत होते. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, २ मुली, ५ भावंडे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.