एन. सी. सी. शिळ उपविजेता
राजापूर (वार्ताहर): शहरातील वरचीपेठ येथील श्री महापुरूष सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कै.समिर गुरव स्मृती क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात वैभव वसाहत लांजा संघाने एन. सी. सी. शिळ संघावर मात करत विजेतेपद पटकावले. एन. सी. सी. शिळ संघ उपविजेता ठरला. या दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषीक व चषक देऊन गौरविण्यात आले.
शहरातील राजीव गांधी क्रिडांगणावर श्री महापुरुष सेवा मंडळाचे वतीने दि. २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत २४ संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धतेत उपांतत्य फेरीत प्रारंभी एन. सी. सी. शिळ व रानतळे यांच्यात झालेल्या सामन्यात शिळ संघाने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर वैभव वसाहत लांजा व विल्ये संघात झालेल्या लढतीत लांजा संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर शिळ व लांजा यांच्यात झालेल्या आणि अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लांजा संघाने शिळ संघावर मात करत प्रथम विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रूपये २५ हजार व चषक, द्वितीय विजेत्या संघाला रोख रूपये १५ हजार व देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ठ फलंदाज म्हणून एन. सी. सी. शिळचा कपिल खाडे, उत्कृष्ठ गोलंदाज मंदार रसाळ वैभव वसाहत लांजा, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक राज गौतम शिळ तर मालिका विर म्हणून राहील झोरे लांजा, उगवता तारा विराज कातारी महापुरूष वरचीपेठ यांना गौरविण्यात आले.
या पारितोषीक वितरण समारंभ प्रसंगी राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, सौ. शुभांगी सोलगावकर, शंकर सोलगांवकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, कुणाल पवार, महेश बाकाळकर, रवींद्र जाधव, सुनिल पवार, दिलीप अमरे आदी मान्यवर उपस्थीत होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निखिल कोठारकर, विकास कोठारकर, बाळा तांबट, प्रमोद मांजरेकर, बाळु रहाटे, संजय मांडवकर चेतन चव्हाण, प्रमोद उर्फ भाई गाडगीळ, अवि तांबट, भाऊ तांबट, किरण मांडवकर, प्रसाद अमरे, भाया अमरे, बाळा गाडगिळ, ओम कोठारकर, फिरोज पठाण, शुभम व सौरभ मांजरेकर, दुर्गा आणी बहाद्दुर बोहरा, विराज कातारी, निर्भय कोठारकर, प्रसन्न भुते, सोहन निरूळकर, ओंकार मांडवकर, निर्भय कोठारकर, पवन तांबडे, तुषार नेवरेकर, तुषार कुवेसकर, नयन जोशी, ओमकार कोठारकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चेतन कोठारकर यांनी केले.