देवगडमधील वृत्त निवेदक संजय धुरी यांचे निधन

देवगड मधील सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगणना व्यक्तिमत्व संजय भालचंद्र धूरी यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले आहे.

देवगड मध्ये त्यांचा बेकरी उद्योग आहे.देवगड मधील सांस्कृतिक विश्वाला हा फार मोठा धक्का मानला जातो. मृत्युसमयी त्यांचे वय 54 वर्षे होते देवगडमधील जल्लोष कार्यक्रमांमध्ये होणारे निवेदन ही त्या कार्यक्रमाची ओळख झाली होती. देवगड मधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते निवेदन करत. देवगड लायब्ररी, देवगड रोटरी क्लब देवगड व्यापारी पर्यटन संघ,सह अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत होते. देवगड मधील व्यापारी संदर्भातील अनेक संस्थांमध्ये ते पदाधिकारी होते

त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे