कणकवली तहसीलदार कार्यालय येथे वॉटर एटीएम चे लोकार्पण.!

कणकवली : रोटरी क्लबने वॉटर एटीएमची जी संकल्पना मांडली आहे ती खरोखरच समाज उपयोगी आहे. तहसीलदार कार्यालयात विविध कामासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात. त्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन रोटरी क्लबने वॉटर एटीएम फक्त १ रुपया मध्ये एक लिटर पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल तहसीलदार आर जे पवार यांनी रोटरी क्लबचे आभार मानले. तसेच वॉटर एटीएम सुरक्षित चालू राहील याची जबाबदारी तहसीलदार कार्यालय घेईल असे आश्वासन ही तहसीलदार आर जे पवार यांनी दिले.

तालुक्यातील तहसीलदार कार्यालय येथे बुधवारी रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून सर्वसामान्य जनतेची तहान भागविण्यासाठी तहसीलदार कार्यालय प्रांगणात वॉटर एटीएम लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम सुरू असते. अलीकडेच काही दिवसापूर्वी सामाजिक प्रश्न, समस्यांची जाणीव असलेले कै. रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांना हा वॉटर एटीएम समर्पित करून तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांसाठी सोईस्कर करून दिला.

वॉटर एटीएम लोकार्पण सोहळ्या दरम्यान आयपीडीजी रोटेरियन गौरीश धोंड, कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, रोट. डॉ. विद्याधर तायशेट्ये, रोट. वर्षा बांदेकर, रोट. शशिकांत चव्हाण, रोट. दीपक बेलवलकर, रोट. दादा कुडतरकर, दीपक अंधारी, नायब तहसीलदार शिवाजी राठोड, नगरसेविका मेगा गांगण, अशोक करंबेळकर तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, रोटरी क्लब ने वॉटर एटीएम प्रकल्प चालू केला आहे तो जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे. अशाच प्रकारचे वॉटर एटीएम शहरातील इतरही भागात बसवण्यासाठी लागणार्या मदतीस कणकवली नगरपंचायत मदत करेल अशी ग्वाही श्री. नलावडे यांनी दिली.

तसेच रोट. डॉ. विद्याधर तायशेट्ये म्हणाले, रोटरी क्लब च्या माध्यमातून आम्ही समाजातील मूलभूत गरजा लक्षात घेतल्या. त्यानुसार एकहात मदतीचा म्हणून रोटरी क्लब च्या माध्यमातून असे समाजपयोगी उपक्रम रबवत असतो. रोटरी च्या या समाजपयोगी उपक्रमांचा समाजातील प्रत्येक घटकाला नक्कीच उपयोग होईल.

गौरीश धोंड पुढे म्हणाले, हायवे लगत वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे वॉटर एटीएम बसवण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच या कामासाठी लागणारे सर्व सहकार्य करु अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक अँड .दीपक अंधारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार दादा कुडतरकर यांनी मानले.