मालवण ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भारत साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न

मेळाव्यात टेलीमेडीसिन सिंधुदुर्गच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

मालवण | प्रतिनिधी : ग्रामीण रुग्णालय मालवण येथे आयोजित आयुष्यमान भारत साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य मेळाव्यात विविध आजारावरील तज्ञ डॉक्टांच्या उपस्थित रुग्णांवर मोफत तपासणी करण्यात आली.

या मेळाव्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व न्युरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रा. लि. बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात सेवा बजावत असलेल्या रेमिडी नोवा सोल्युशन किटपासून विकसित झालेल्या टेलिमेडिसिन यंत्रणेद्वारे मोफत उपचार करून आरोग्य शिबिर राबविण्यात आले. या शिबिरामध्ये प्राथमिक स्वरूपाच्या सर्व तपासण्या करून रुग्णांना औषधे देण्यात आली.

या आरोग्य शिबिराला रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, राजेश पारधी, रुपेश बिडिये, पंकज पेडणेकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण यांनी भेट दिली हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रकल्प समन्वयक प्रतिक दुसेजा, नर्स अनघा गावडे तसेच ग्रामीण रुग्णालय मालवण मधील डॉक्टर्स व सर्व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती प्रकल्प सहाय्यक समन्वयक सुमित सावंत यांनी दिली.