शांतिनिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील नामदार भाई साहेब सावंत प्रतिष्ठान संचलित शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल सावंतवाडी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन कलाबहार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आर. पी. डी. हायस्कूलच्या नवरंग कला मंच येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे – परब मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय विकास भाई सावंत होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. सी. एल. नाईक, व्ही. बी. नाईक सर, श्री. अमोल सावंत, श्री दिनेश नागवेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे सन्मानचीन्हे व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या परीक्षेत संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात सर्वप्रथम आलेली प्रशालेची विद्यार्थिनी कु. सेजल उषा पवार हिचा विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 22-23 साठी प्रशालेतून कु. गार्गी किरण सावंत (प्राथमिक विभाग) व कु. उर्मी गुरुदत्त कामत (माध्यमिक विभाग) यांची आदर्श विद्यार्थीनी म्हणून निवड करण्यात आली. प्रशालेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु. यश उदय नाईक (इ.दहावी) व कु. निशा खेताराम चौधरी ( इ. नववी) यांना गौरविण्यात आले. तसेच विविध शालेय व शाळाबाह्य स्पर्धेत चमकदार कामगिरी साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शितोळे प्रास्ताविक श्री. समीर परब सर (मुख्याध्यापक) तसेच अहवाल वाचन श्रीकृष्ण कुडतरकर व आभार प्रदर्शन मिलिंद आजगावकर यांनी केले याप्रसंगी प्रशालेचे बहुसंख्य पालक शिक्षणप्रेमी व पत्रकार उपस्थित होते.