२५ फेब्रुवारी रोजी मा.पं.शि.प्र मंडळ माखजन ची त्रैवार्षिक निवडणूक

 

२३ उमेदवार रिंगणात

माखजन |वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माखजन(सरंद) या शैक्षणिक संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक २५ फेब्रुवारी होणार आहे.१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे.११सदस्यीय विश्वस्त मंडळासाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत.

२३ उमेदवारांनी फॉर्म भरल्यावर छाननी वेळी सगळे फॉर्म वैध ठरले आहेत. २५ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे.या सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल.संस्थेकडे उपलब्ध माहिती नुसार मृत सभासद वगळता सुमारे ४६६ सभासद संख्या आहे.

रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांपैकी, विद्यमान ११ विश्वस्थांचा समावेश आहे.२५ रोजी दुपारी २.५० वाजता या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.ही विशेष सर्वसाधारण सभा व निवडणूक प्रक्रिया प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे.सदर माहिती संस्थेचे सचिव यांनी स्वाक्षरी सह सूचना फलकावर प्रसिद्ध केली आहे.