प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेसाठी सुसेरी गावाची निवड

खेड  तालुक्यातील दुसरे गाव

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील दुसरे गाव; यापूर्वी तीन गावांना मिळाला मान खेड तालुक्यातील सुसेरी या गावाची ‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम साठी निवड झाली आहे. या गावाच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून २० लाखाचे अनुदान दिले जाणार आहे. आदर्श ग्रामसाठी निवड झालेले खेड तालुक्यातील हे दुसरे गाव आहे,

 

 

२०२२-२३ या वर्षात रत्नागिरी

जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील ४० टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नांदगाव खुर्द (ता. चिपळूण), दाभोळे (ता. संगमेश्वर) आणि अलसुरे (ता. खेड) या गावाची निवड ‘आदर्श ग्राम’साठी करण्यात

आली होती. या तीनही गावांमधील विकासकामांची यादी निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष कामे सुरू झाल्यावर केंद्र शासनाकडून २० लाख रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात आला.

 

या तीन गावांपैकी नांदगाव खुर्द आणि दाभोळे या गावांमधील नियोजित कामे पूर्ण झाल्याने या गावांना २० लाखांचा निधी मिळाला. पण त्याचबरोबर या दोन गावांना ‘कम्युनिटी हॉल’ मंजूर झाला आहे. यासाठी या गावांना २५ लाख रुपयांचा निधी या योजनेंतर्गत मिळणार आहे.

 

त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून, आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ‘कम्युनिटी हॉल’साठी निधी मिळेल. अलसुरेतील ‘कम्युनिटी हॉल’ची मंजुरी प्रलंबित आहे,

 

गावांची निवड झाल्यानंतर त्या गावातील गावकऱ्यांच्या विचाराने लाख त्या गावातील कामे निश्चित केली रुपयांचे केंद्र जातात. त्यासाठी केंद्राकडून दोन सरकारकडून किंवा तीन टप्प्यात २० लाख अनुदान रुपयांचा निधी मिळतो.

जातीतील किंवा नवबौद्ध समाजाची असेल, त्या गावाची ‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम’साठी निवड केली जाते. लोकसंख्येच्या निकषावरून केंद्र सरकार गावांची नावे निश्चित करते.

 

दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. यात सर्व विभागांचे प्रमुख सदस्य असतात तर समाज कल्याण सहायक आयुक्त सदस्य सचिव असतात.