मंडणगड | प्रतिनिधी : राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड येथील विद्यार्थ्यांनी अबॅकस परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल चा इयत्ता नववी मध्ये शिकणारा कुमार सुशांत हनुमंत दहिफळे याने राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये चौथा नंबर पटकावलेला आहे .तसेच इयत्ता नववी मधून आर्यन गजानन जाधव, पाचवी मधून कुमार श्रीयान संजय किंजळे, सातवी मधून सृष्टी सदाशिव कुंभार आणि सिमरन गजानन जाधव यांनी गोल्ड मेडल पटकावले आहे. यांचंही अभिनंदन केले .या विद्यार्थ्यांना अबॅकस शिकविणारे शिक्षक श्री. महेश सुतार, जयेश कुलाबकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन संतोष मांढरे, मुख्याध्यापक श्री. महाजन व मुख्याध्यापिका सौ.ठसाळे व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.