खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यात लंपी च्या आजाराने डोके वर काढल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. लंपी ची साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. एस. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांमार्फत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आतापर्यंत आढळलेल्या ६७ जनावरांपैकी ६३ जनावरे बरी झाली आहेत. अवघी ४ जनावरे सक्रिय असल्याची माहिती देण्यात आली. लंपी चा आजार रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लंपी सदृश जनावरे इतर जनावरांपासून विलगीकरणात ठेवावीत, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. राऊत यांनी केले आहे.