खेडमध्ये ‘फळबाग’साठी साडेअकरा कोटींचा निधी खर्ची

खेड. (प्रतिनिधी) खेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या ६ वर्षात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी ११ कोटी ८४ लाखाहून अधिक निधी खर्ची पडला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

या योजनेत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत शेतीपूरक रोजगार मिळवला. शासनाकडून थेट बँक खात्यात मजुरी जमा झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. शांसनाच्या योजनेसाठी तालुक्यातील अनुसूचित जाती- जमाती, भटक्या- निरधिसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री व दिव्यांग कुटुंबप्रमुख कुटुंबे, प्रधानमंत्री आवास योजना, पारंपारीक वनवासी प्रवर्गातील ऑनलाईन जॉब

गेल्या सहा वर्षात तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील २२८५.७५ हेक्टर क्षेत्रात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यासाठी ३५२८ मजुरांना ११ कोटी ८४ लाख १ हजार ८७९ रूपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला आहे.

 

 

२०१८-१९ मध्ये ४३४.८० हेक्टर क्षेत्रावर ६१९ मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ८० लाख ४६ हजार २६ रूपयांचा निधी खर्ची पडला. २०१९-२० मध्ये ७४९ मजुरांनी ५६१.९५ हेक्टर क्षेत्रावर २लाख २५ हजार ३३९ रूपये खर्ची पडले. २०२०-२१ मध्ये ३८१.४५ हेक्टर क्षेत्रावर ६२९ लाभार्थी मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ७२ लाख ७४५ रूपये खर्ची पडले.

 

२०२१-२२ मध्ये ५९५ मजुराने ३५६.२५ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. यासाठी २ कोटी ८४ लाख ८७ हजार २३८ रूपयांचा निधी खर्ची पडला. २०२२-२३ मध्ये २६०.७० हेक्टर क्षेत्रावर ४२४ मजुरांनी लागवड केली. यासाठी त्यासाठी १ कोटी ६९ लाख ८ हजार ८३६ रूपयांचा निधी खर्ची पडला. तर २०२३-२४ आर्थिक वर्षात २६ डिसेंबरअखेरपर्यंत ५१२ लाभार्थी मजुरांनी २९०.६० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी १ कोटी ४२ लाख ३३ हजार ६९५ रूपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला.