खेड(प्रतिनिधी)।खेड तालुक्यातील घेरारसाळगड- पेठवाडी, तांबडवाडी, जानकरवाडी, ढेबेवाडी, चिराचा आंबा व भुत्राय, जय हनुमान नवतरुण मित्रमंडळ मुंबई यांच्यातर्फे घेरारसाळगडावर ७ जानेवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी घटस्थापना, छबिना, हरिपाठ, महाप्रसाद, हरिदिंडी जागर, कीर्तन, सत्कार समारंभ, दिंडी व काकड आरती आदी धार्मिक कार्यक्रम होतील. ८ जानेवारी रोजी सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, मनसेचे राज्यसरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे.