३७ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूकप्रकरणी सराफास अटक

खेड (प्रतिनिधी)सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवत बनावट दागिने बँकेत सोनेतारण करण्याकरिता गहाण ठेवत बँकेची ३७ लाख ७५ हजार ५८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या नियुक्त प्रदीप रामचंद्र सागवेकर सराफास येथील पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता ३ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य ९जणांवरही अटकेची टांगती तलवार कायम आहे.

 

 

येथील आयडीबीआय बँकेशी करारनामा करत प्रदीप सागवेकरची सराफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बनावट दागिने खरे असल्याचे भासवताना तसे प्रमाणपत्रही देत बँकेची फसवणूक केली होती.

याबाबत आयडीबीआय बँकेचे जितेंद्र नारायणदास शाह यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यासह अन्य ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यामध्ये सौरभ विष्णू सागवेकर, निलिमा निलेश सागवेकर, सागर रमेश सागवेकर, निलेश रमेश सागवेकर, सुधीर पर्शुराम राणिम, अक्षता सुधीर राणिम, समीर रघुनाथ म्हसळकर राहुल अनंत सकपाळ, कमलाकर हरिश्चंद्र पालकर यांचाही समावेश आहे. याबाबत तपास पो. नि. नितीन भोयर करत आहेत.