द…दारूचा नव्हे, द दुधाचा ‘अंनिस’ने दिला नवा संदेश

खेड(प्रतिनिधी)महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खेड येथे ‘व्यसनाला बदनाम करू या’ कार्यक्रमाचे आयोजन खेड एसटी स्टँड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमातून नवीन वर्षांचे स्वागत दूध पिऊन करा. द… दारुचा नव्हे, द दुधाचा असा संदेश नागरिकांना देण्यात आला.

 

 

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर, नशाबंदी मंडळ रत्नागिरी जिल्हा संघटक सचिन शिर्के, जय हनुमान मित्र मंडळ हेदलीचे अध्यक्ष संदीप गोवळकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक फागे, अंनिसचे शैलेंद्र सकपाळ, पंकज शिर्के, प्रशांत गमरे, सचिन मोहिते, मनीषा गोवळकर, साधना गोवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

यावेळी माध्यमाशी बोलताना गोवळकर म्हणाले की, समाजातील व्यसनाधीनता वाढत असून, व्यसनाला प्रतिष्ठा मिळू पहात आहे आणि तरुणाई मोठ्या प्रमाणावर याला बळी पडत आहे. कमी वयात लागलेले व्यसन हे दीर्घकाळ टिकते, त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. . ३१ डिसेंबर अर्थात नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारे सेलिब्रेशन तर दारूशिवाय पूर्णच होत नाही, असा अपसमज निर्माण झाला आहे.

 

यावेळी शिर्के म्हणाले की, कित्येक तरुण मुलांच्या आयुष्यातील महाराष्ट्र अथश्रद्धा निर्मूलन समिती

व्यसनाची सुरुवात या दिवसापासून होते. नववर्षाच्या स्वागतानिमित्त खूपजण मद्यपान किंवा इतर नशेचे पदार्थ सेवन करुन करतात, केवळ मजा म्हणून केलेली ही सुरुवात पुढे व्यसनात कधी बदलते हे रोखण्यासाठी हा उपक्रम घेतला गेला होता