जाधवर नर्सिंग कॉलेज पुणे येथील मुलींना दिले प्रशिक्षण
चिपळूण (वार्ताहर) : राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणी क्रीडा विभाग आयोजित व यूनिवर्सल स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन गुरुवार २८ रोजी जाधवर नर्सिंग कॉलेज नऱ्हेगाव सिंहगड पुणे येथे करण्यात आले होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
आजच्या युगात महिला स्वतःच्या पायावर उभी राहत आहे. यशाचे शिखर ही गाठत आहे. मात्र, असे असले तरीही आजही महिलांवर अत्याचार होत असतात. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठीच खास मुलांकरिता स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. यातून कठीण प्रसंगी स्वतःचे रक्षण कसे करावे याचे धडे प्रशिक्षण नम्रता मुंदडा यांनी उत्तम प्रकारे दिले. यावेळी प्रशिक्षक सचिन उतेकर यांचेही मुलींना मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास खडकवासला अध्यक्ष बाबा धुमाळ ,खडकवासला महिला अध्यक्ष सुनीता ताई डांगे , पुणे शहर उपाध्यक्ष भावनाताई पाटील, युवती पुणे शहर कार्याध्यक्ष मयुरी तोडकर ,खडकवासला उपाध्यक्ष शिल्पा ताई यादव,खडकवासला उपाध्यक्ष मीनल ताई सोनवणे ,खडकवासला प्रवक्ता राजेश्री खिल्लारे , संध्याताई टाकले प्रभाग अध्यक्ष सविताताई बेटेगिरी, प्रभाग उपाध्यक्ष सुनंदा ताईथोपटे, सृष्टी टिळेकर ,पार्वती आव्चार , ऋतुजा पाटील, सिद्धी थोरात, प्रीती मोटे , लक्ष्मी प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती अध्यक्षा सायली टिळेकर आणी क्रीडा अध्यक्ष सचिन उत्तेकर यांनी केले होते.