अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी सुमित कुळे

चिपळूण ( वार्ताहर) : अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी वेरळ येथील सुमित संतोष कुळे यांची निवड करण्यात आली आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक दि. १ जानेवारी रोजी पार पडली . या बैठकीत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी निवड करुण सुमित कुळे यांना नियुक्तीपत्र दिले. खेड वेरळ येथील सुमित कुळे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची तळमळ सुरू असते. ते कायद्याचे शिक्षणही घेत आहेत. त्यामुळे समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना त्यांचा नेहमीच विरोध असतो. त्यांच्या कामाची दखल घेत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य,या संघटनेने त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.

या संघटनेच्या वतीने माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करण्यात येणार आहे. भ्रष्ट नोकरशाहीचा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश संघटना करणार आहे. सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी बैठकीत दिली.सुमित कुळे यांच्या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.