एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये दिनांक ०२/०२/२०२३ आणि ०३/०२/२०२३ रोजी ,FUEL Aptitude ट्रेनिंग प्रोग्राम या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला सिनिअर ट्रेनर म्हणून स्वप्नील पाटील ,FUEL ,पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री. स्वप्नील पाटील हे गेली 7 वर्षे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना aptitude ट्रेनिंग बाबत मार्गदर्शन करत आहेत,तसेच त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील 50 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग दिलेले आहे.
सदर कार्यशाळेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये नोकरी साठी लागणाऱ्या स्किल व त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या ट्रेनिंग चा फायदा महाविद्यालयातील कॉम्पुटर,इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स आणि AIML शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना झाला.
एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २२ वर्षांपासून संस्थापक सन्मा. नारायणराव राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सन्मा. निलमताई राणे, ऊपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव सन्मा. नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे.
सदर कार्यशाळेसाठी कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सोमनाथ मेलसगरे यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनीश गांगल ,प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे,सर्व विभाग प्रमुख महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.