शाळेच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना बुटाचे वाटप
लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील कणगवली जि प पूर्ण प्राथमिक शाळेला फैझान ए कोकण फाउंडेशन या संस्थेचे वतीने विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप करण्यात आले. फैझान ए कोकण फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी देखील या संस्थेने शाळेला शैक्षणिक स्वरूपात मदत केलेली आहे .या संस्थेमार्फत शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना बुटाचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या उपशिक्षिका माळी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन तसेच शाळेचा पट वाढवण्याच्या दृष्टीने संस्थेकडे विद्यार्थ्यांना बुटाची मागणी केली होती .ही गरज लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच संपदा चव्हाण,कोकण फाउंडेशनचे सेक्रेटरी खलीद कासू, खजिनदार हनिफ कासू, सल्लागार रफिक पठाण, सदस्य रेहेमेतुल्ला कासू साबीर पठाण, मुबीन कासू ,मोईन कासू ,इकबाल रखांगी, जमातुल मुस्लिमिन कणगवली सेक्रेटरी सत्तार कासू, ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर, सदस्य दीप्ती इंगळे, मानव अधिकार आयोगाचे लांजा तालुका अध्यक्ष संजय सावंत तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कांबळे, सदस्य ,अंगणवाडी सेविका व पालक वर्ग उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शाळेच्या उपशिक्षिका माळी यांनी फैझान ए कोकण फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.