पत्रकार दुर्गेश आखाडे यांना मातृशोक

Google search engine
Google search engine

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरीतील पत्रकार दुर्गेश आखाडे यांच्या मातोश्री शांताबाई धोंडू आखाडे यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६६ होते.
रत्नागिरीतील पत्रकार दुर्गेश आखाडे यांच्या मातोश्री शांताबाई धोंडू आखाडे यांना राहत्या घरीच बुधवारी सकाळच्यावेळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा मुलगा दुर्गेश हा आपल्या नियोजित कार्यक्रमाकरीता मंगळवारी चिपळूण येथे गेला होता. बुधवारी सकाळी दुर्गेश घरी आल्यानंतर त्याने घरात प्रवेश केला त्यावेळी त्याने समोरचे चित्र पाहून शेजारच्यांना आवाज दिला. मात्र शेजारी पुरुषमंडळी कोणीच नसल्याने त्याने तत्काळ आपल्या सहकारी पत्रकारांना लागलीच त्याची कल्पना दिली. ही माहिती मिळताच काही पत्रकार दुर्गेश याच्या घरी जाऊन पोहोचले. तत्काळ रुग्णवाहिका मागवण्यात आली. शांताबाई यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या शांताबाई यांनी आपल्या मुलांना खडतर काळात चांगले शिक्षण दिले. आज त्यांची मुले विविध क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात ४ मुले, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शांताबाई यांचे अंतिम संस्कार हे गुरुवारी सकाळी ८ वाजता भागोजीशेठ कीर स्मशानभूमीत होणार आहेत.