पाटपन्हाळे (वार्ताहर ) बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये राज्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे असे चित्र सर्वत्र पहायला मिळत असतांना गुहागर तालुकाही मागे नाही हे दाखवितांना तालुक्यातील निवोशी गावातील पाचही वाड्यांनी एकमुखी आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जाहीर केले.
गुहागर तालुका बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर अँड. श्री.सुशिल अवेरे यांनी आपल्या कामाला सुरुवात करतांनाच गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेवुन व त्यांच्यावरती पुर्णपणे विश्वास ठेवुन सर्वच्या सर्व पाचही वाड्यांतील ग्रामस्थांनी एकमते निर्णय घेत आपण पुर्णपणे पाठीशी असल्याचे सांगितले.
आपल्या गावात अनेक सुशिक्षित मुले असुन त्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे तसेच त्यांनी रोजगाराकरीता शेतीसह काही उद्योग करायचा म्हटल्यास रस्ते पाणी याचबरोबर विजेचा मोठा प्रश्न आहे. व तो सोडविण्याची मागणी अनेकांकडे करण्यात आली मात्र ती पालकमंत्री व उद्योगमंत्री मा.उदयजी सामंत हेच पुर्ण करतील असा ठाम विश्वास दाखवत पाठिंबा जाहीर केला.यावेळी गावातुन आबा अवेरे,अर्जुन अवेरे,किरण अवेरे,शांताराम मांडवकर,लक्ष्मण मांडवकर,सखाराम सोलकर,बाबाजी अवेरे व संदेश अवेरेसह नानेवाडी,भेलेवाडी,कातळवाडी व गणेशवाडीतील अनेक ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.
याकरीता काल एक सभा घेण्यात आली व त्यामध्ये सर्व वाडीप्रमुखांसह पदाधिकारी जर होते.यावेळी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी उपस्थितांची बाजु ऐकुण घेतल्या व मार्गदर्शन केले.यावेळी सचिव संतोष आग्रे,उपशहरप्रमुख मोरे, शहर संघटक कचरेकर आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.