संदिप स्मृती मित्र मंडळ, लांजाच्या वतीने रविवारी १२ फेब्रुवारी रोजी संदिप स्मृती मॅरेथॉन 2023 चे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) येथील संदिप स्मृती मित्र मंडळ, लांजाच्या वतीने रविवारी १२ फेब्रुवारी रोजी लांजा तालुका मर्यादित संदिप स्मृती मॅरेथॉन 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
लांजा तालुक्यात प्रथमच संदिप स्मृती मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील युवक, युवतीमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जाणण्याचा उद्देश या मॅरेथॉनमागे आहे. साठवली रोड तिठा, ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १४ खालील मुले व मुली ( २ किमी), १५ ते १९ वर्षातील मुले ( किमी), १५ ते १९ वर्षातील मुली (३ किमी), १९ वर्षावरील मुले व मुली (७ किमी) संदिप स्मृती विशेष ३० वर्षावरील महिला (२ किमी) व ४५ वर्षावरील पुरुष (२ किमी) या गटात घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आहे.
जास्तीत जास्त लांजा तालुकावासियांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान संदिप स्मृती मित्र मंडळ, लांजा यांच्याकडून करण्यात आले आहे.
प्रथम नोंदणी करणाऱ्या ४०० स्पर्धकांना मोफत टी शर्ट देण्यात येणार आहे. स्पर्धा नोंदणीची अंतिम तारीख १० फेब्रुवारी असून स्पर्धेसाठी नावनोंदणी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
स्पर्धा सकाळी ठीक ६:३० वाजता सुरू होईल.
अधिक माहितीसाठी योगेश पाटोळे-
9922352772, निलेश कातकर-8007221143 सुयोग तांबे- 9028756720 यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.