तळवली ग्रा पं. मध्ये सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन

सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

गुहागर (प्रतिनिधी):सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महेश शिगवण यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील महत्वाच्या ठिकणी सीसीटीव्ही कॅमेरे स्वखर्चाने बसवून गावाच्या सुरक्षेसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.गावातील माजी सैनिक गोविंद खोकरे यांच्याहस्ते या सीसीटीव्ही कॅमेराचे तळवली ग्रा.पं. कार्यालयात उदघाटन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या पत्नी व तळवली गावाच्या सरपंच मयुरी शिगवण,उपसरपंच अनंत डावल,माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत,सदस्य संतोष जोशी,पूर्वा पवार,प्रतीक्षा जाधव, मानसी पोफळे, सामाजिक कार्यकर्ते व प्रा.अमोल जडयाळ,विजय पवार,बाळकृष्ण कांबळे,पोलीस पाटील विनोद पवार, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष उत्तम पवार,पत्रकार आशिष कारेकर, प्रदीप चव्हाण,दीपक शेवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ पार पडला.
यावेळी गावातील गरजू लोकांना महेश शिगवण यांच्याकडून मोफत स्वेटर वाटप देखील करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल जडयाळ यांनी तर उपस्थितांचे आभार सदस्य संतोष जोशी यांनी मानले.