१२वी जिल्हास्तरीय सब्ज्युनियर तिरंदाजी स्पर्धा दि. १२ फेबृवारी

Google search engine
Google search engine

१२वी जिल्हास्तरीय सब्ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी जिल्हा तिरंदाजी असोसिएशनने चंपक मैदान, चर्मालय रोड, रत्नागिरी येथे दि १२ फेबृवारी, २०२३ रोजी केले आहे. या तिरंदाजी स्पर्धा इंडियन, कंपाऊंड व रिकर्व्ह या तीन प्रकारात होणार असून या स्पर्धेतून प्रत्येक प्रकारातून पहिल्या सहा जणांची निवड २१ ते २३ फेबृवारी २०२३ या कालावधीमध्ये क्रिडा संकुल, लातूर येथे होणाऱ्या राज्य सब्ज्युनियर तिरंदाजी स्पर्धा, लातूर या स्पर्धेसाठी होणार आहे.या स्पर्धेसाठी खेळाडू ०१-०१-२००६ नंतर जन्मलेला असावा. इच्छुक खेळाडूंनी २ फोटो, वयाचा मूळ दाखला व स्वतःचे धनुर्विद्येचे साहित्य आणावयाचे आहे.
खेळाडूचे जिल्हा व राज्य खेळाडू रजिस्ट्रेशन असणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी याची नोंद घेऊन जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य पंच श्रीमती समिधा झोरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ८६६८४८१६२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

वरिलप्रमाणे क्रीडा वृत्त आपल्या सुप्रसिध्द दैनिकात छापून आणावे हि विनंती. धन्यवाद !

आपली विश्वासू
श्रीमती समिधा संजय झोरे