आर.सी.सी चे सायकल पट्टू होणार कुडाळ च्या मॅरेथॉन मध्ये सहभागी

Google search engine
Google search engine

माखजन | वार्ताहर : सिंधुदुर्गातल्या कुडाळ मध्ये १२ फेब्रुवारी रोजी इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ या भव्य सायकल मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.या मॅरेथॉन स्पर्धेसाठी रत्नागिरी तुन रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब चे सायकल पट्टू सहभागी होणार आहेत.पेडल फॉर हेल्थ..पेडल फॉर एव्हीरॉनमेंट ही टॅग लाईन घेऊन २५,५०,१०० की.मी अशा भव्य सायकल मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मार्च २०२२ मध्ये आर.सी.सी संच स्थापना झाली तिथपासून या क्लब च्या माध्यमातून ८२ हजार किलोमीटर इतके सायकलिंग झाले आहे.विविध १२ उपक्रम राबवले आहेत.२०० सायकल प्रेमींच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
वाढत्या प्रदूषणाचा विचार करता व उत्तम स्वास्थ्यासाठी असलेला सायकल चा व्यायाम यामुळे सध्या सायकल चालवण्याकडे सर्वत्र कल वाढीस लागला आहे.आर. सी. सी च्या विविध उपक्रमा मुळे व विविध स्पर्धात सहभागी होण्याने तरुणाईचे सायकलिंग कडे लक्ष वेधाण्यास मदत होत आहे.
कुडाळ च्या सायकल मॅरेथॉन् मध्ये रत्नागिरी च्या रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब चे २५ सायकल पट्टू सहभागी होत असल्याने जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत