सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून सन्मान
मसुरे | झुंजार पेडणेकर
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचे शिक्षक एन. जी. वीरकर यांना नुकताच अनंत केळकर हायस्कूल वाडा देवगड येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे कार्यवाह शिवशरण बिराजदार ,प्रवीण आंबोळे, डॉक्टर दीपक शेटे, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ
अध्यक्ष वामनराव खोत, तुकाराम पेडणेकर, औदुंबर भागवत ,अनंत केळकर हायस्कूल वाडा चे मुख्याध्यापक नारायण माने , मालवण तालुका गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष प्रसाद कुबल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणित संबोध , प्राविण्य ,गणित प्राज्ञ परीक्षा अशा अनेक परीक्षा यशस्वीपणे आयोजित केल्या जातात आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार केला जातो .शिक्षकांसाठी चर्चा सत्रे, शिबिरे आयोजित केली जातात .उपक्रमशील गणित शिक्षक ,उपक्रमशील मुख्याध्यापक अशा प्रकारे गणित विषयासाठी कार्यशील असणाऱ्यांचा बहुमान गणित मंडळांच्या वतीने करण्यात येतो. एन जी वीरकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगे आजी, माजी पदाधिकारी, सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी , पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.