लोककला महोत्सवात मांडकी खुर्द येथील जय हनुमान भारुड मंडळाने रसिकांची मने जिंकली

Google search engine
Google search engine

संतोष कुळे | चिपळूण : चिपळूण येथे आयोजित केलेल्या लोककला महोत्सवामध्ये स्थानिक कट्ट्यावरील लोककला सादर करताना चिपळूण तालुक्यातील मांडकी खुर्द येथील जय हनुमान प्रसादिक भजनी भारुड मंडळ यांनी जनजागृतीपर भारुड सादर करत रसिकांची मने जिंकली.

जय हनुमान प्रसादिक भजनी भारुड मंडळ मांडकी खुर्द यांनी वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचा वेष आणि भजन सादर करताना विठ्ठल नामाची महती पटवून दिली. त्यानंतर कमी वेळात त्यांनी समाजातील कर्मकांडावर प्रकाश टाकला. लोक भगतगिरीला कसे फसतात. त्यातून कसे कलह निर्माण होतात. यावर अतिशय कमी वेळात प्रकाश टाकला. आजपर्यंत याच भारुड मंडळांने गेली अनेक वर्ष कार्यक्रम करताना कार्यक्रमातून सामाजिक संदेश देण्याचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गतवर्षी हेच भारुड मंडळ बीडमध्ये जाऊन आपली कला सादर करून आले. या ठिकाणी सुद्धा रशिकांचा त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. या लोककला महोत्सवात त्यांनी केलेली वेशभूषा आणि सादरीकरण यामुळे उपस्थित रसिकांनी त्यांच्या कलेला दाद दिली. यामध्ये कलाकार तानाजी गुडेकर, सुभाष डिके आणि सर्व कलाकार मंडळी यांनी परिश्रम घेत लोककला महोत्सव मध्ये मिळालेली संधी सार्थकी करून दाखवली. आयोजकांनी त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देत गुणगौरव करत सर्व कलावंतांचे कौतुक केले.