कळंबट होळीचे मैदान येथे उद्यापासून कुणबी युवा चषक क्रिकेट स्पर्धा

चिपळूण | वार्ताहर : तालुक्यातील कळंबट येथील कुणबी युवा चषक २०२३ या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी कळंबट होळीचे मैदान सडेवाडी येथे करण्यात आले आहे. कुणबी युवा चषक चिपळूण कळंबट २०२३ या स्पर्धेसाठी प्रवेश फी दोन हजार रुपये आकारण्यात आली आहे.
ही स्पर्धा अ गट ओपन व ब गटात गाव मर्यादित संघ खेळविण्यात येतील. यामध्ये कळंबट, केरे, पातेपिलवली, मुर्तवडे खांडोत्री, आबिटगाव व वहाळ या गावातील संघ ब गटात खेळतील. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक १० हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिकही ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन घाणेकर, महेश घाणेकर, ऋषिकेश मोरे, संतोष आगरे व कुणबी युवा कार्यकर्ते अथक मेहनत घेत आहेत. या स्पर्धेत संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.