नेमळेत कृषी विभागातर्फे आंबापिक शेतीशाळा

आंबा पिकावरील रोग व आंबा पूनर्जीवन योजना याविषयी मार्गदर्शन

नेमळे । प्रतिनिधी : कृषी विभाग सावंतवाडी अंतर्गत नेमळे ग्रामपंचायत सभागृहात आंबा पिकावरील किड, रोग, हवामानात होणारे बदल फळप्रक्रिया सल्ला व्यवस्थापन अंतर्गत आंबापिक शेतीशाळा वर्ग घेण्यात आला. या वर्गाला मंडळ कृषी अधिकारी विजय वाघमारे यांनी आंबा पिकावरील किडी व रोग आंबा पूनर्जीवन योजना याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी नेमळे ग्रामपंचायत सरपंच विनोद राऊळ ,ग्रामपंचायत सदस्य सुहास पिकुळकर.,भास्कर मुननकर,प्रगतशील शेतकरी विश्वनाथ नाईक ,एकनाथ राऊळ ,लिलाधर राऊळ दिगंबर वायगणकर ,मुकूद आबेरकर,हेमंत राऊळ तसेच नेमळे गावातील इतर आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कृषी वर्गाचे आभार नेमळे कृषी सहाय्यक प्रिया निरवडेकर यानी मानले.

Sindhudurg