वेंगुर्ले येथे दि. 14 व 15 फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक 2023 आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत निर्णय

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले येथील सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत भंडारी समाजातील तरुण समाज बांधवांना समाजकार्याची गोडी लागण्यासाठी लावण्यासाठी व करिअर घडविण्यासाठी महासंघाने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले असून त्याचे यजमानपद वेंगुर्ले तालुक्याला देण्याचे ठरले.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गची सभा येथील साईमंगल कार्यालयात भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेत अजेंड्याप्रमाणे विषयवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. वेंगुर्ले येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत 8 तालुक्याचे क्रिकेट संघ सहभाग घेणार असून त्यातून उत्कृष्ट असा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी संघ निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन समिती स्थापन केलेली असून आहे. या समितीचे प्रमुख बाबली वायंगणकर, जयराम वायंगणकर, राधाकृष्ण ऊर्फ राजू गवंडे हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ राज्य पातळीवर खेळविण्यासाठी महासंघ प्रयत्न करणार आहे.
सदर सभेत सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य, उपाध्यक्ष सुनील नाईक, खजिनदार लक्ष्मीकांत मुंडे, सदस्य अतुल बंगे, शेखर उर्फ राजू गवंडे, जयप्रकाश चमणकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, दिलीप पेडणेकर, उल्हास हळदणकर, मनोहर पालेकर, सुरेश धुरी, भरत आवळे गुरुजी, प्रा. आनंद बांदेकर दीपक कोचरेकर इत्यादी बहुसंख्या समाज बांधव उपस्थित होते.