मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व कर्करोग निदान शिबिर संपन्न

Google search engine
Google search engine

ना. दीपक केसरकर मित्रमंडळाचे आयोजन

रक्तदान शिबिरालाही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी । प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ना. दीपक केसरकर मित्र मंडळाच्यावतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी तसेच कॅन्सर निदान शिबिर व महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, भारती मोरे, प्रसन्ना उर्फ नंदू शिरोडकर, आबा केसरकर, गजानन नाटेकर, नंदू गावडे, सुजित कोरगावकर, परशुराम चलवाडी, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, विनायक सावंत, अभिजीत मेस्त्री तसेच शैलेजा पारकर, प्रतिमा सिंग, अरुणा बांदेकर, स्वप्ना नाटेकर, पूजा नाईक, नीलिमा चलवाडी, सुवर्श्री गाड, आदी उपस्थित होते.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी शिबिराचे उद्देश आणि होणाऱ्या उपचारांबाबत माहिती दिली यावेळी तज्ञ डॉ संदीप सावंत गिरीश कुमार चौगुले, डॉ. आकाश एडकर तसेच डॉ. वैशाली शिरोडकर यांनी कर्करोगाबाबत विशेषतः स्त्रिया आणि पुरुषांना मार्गदर्शन केले आणि तपासणी केली. यावेळी वैद्यकीय कर्मचारी सिस्टर विजया उबाळे श्रीमती बागेवाडीकर, रेडकर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विभागाच्या आरोग्य मित्र शोभावती कोरगावकर शालिनी विरोडकर प्रगती कदम प्राची राणे अमृता मुंगी विद्या हेळेकर सुप्रिया नाईक जानवी कुसे यांची उपस्थिती होते.

सदर शिबिरात सर्व आवश्यक चाचण्या व उपचार मोफत करण्यात आल्या. शिबिराचा सामान्य जनतेला लाभ देण्यात आला तसेच रक्तदान शिबिरा मध्ये सिंधू रक्त मित्र संघटनेच्या रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.

Sindhudurg