मठ येथे आफळेबुवा रंगविणार अफजल खान वधाचे आख्यान

Google search engine
Google search engine

लांजा : मठ (ता. लांजा) येथील भवानीसोमेश्वर मंदिरात येत्या १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत रुद्रानुष्ठान होणार असून त्यानिमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे अफजल खान वधाच्या आख्यानविषयावरील कीर्तन होणार आहे. याशिवाय मुग्धा भट-सामंत यांचे गायन तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

मठ येथील भवानीसोमेश्वर मंदिर ८०० वर्षे जुने असून चार वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मंदिरात मूळचे चोरवणे (ता. संगमेश्वर) येथील आणि आता मठ येथील रहिवासी जयवंत गोपाळ कामत यांनी अतिरुद्र जप आणि महारुद्र स्वाहाकाराचे अनुष्ठान आयोजित केले आहे. ते १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. याच कालावधीत दररोज रात्री कीर्तन, भजन, गायनादी कार्यक्रम होणार आहेत. त्यांचा तपशील असा – १३ फेब्रुवारी – अशोक शिंदे यांचे भजन, १४ फेब्रुवारी – चारुदत्तबुवा आफळे यांचे अफजल खान वधाच्या आख्यानावरील कीर्तन, १५ फेब्रुवारी – सौ. मुग्धा भट-सामंत यांचे गायन. त्यानंतर १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत दररोज रात्री १० वाजता शिवरात्रोत्सवानिमित्ताने विनोदबुवा खोंड यांचे कीर्तन होईल.

या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.