कलिंगड सह काकडी, वांगी इत्यादी पालेभाजी यातून बनविला आर्थिक उन्नतीचा मार्ग
देवरुख | प्रतिनिधी : कृषी क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर तिचा उपयोग नोकरीसाठी न करता स्वतःच्याच शेतात निरनिराळे प्रयोग करत आहे तो म्हणजे लोवलेतील युवक शुभम दोरखडे. या तरुणाने एकाच वेळी ५०० किलो मेलोडी या जातीचे कलिंगड उत्पादन घेतले आहे. कलिंगड सह काकडी, वांगी इत्यादी पालेभाजी चे उत्पादन घेतले आहे.
शुभमने दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त केली. त्या नंतर तो स्वमालकिच्या जागेत गेली पाच सहा वर्ष निरनिराळे प्रयोग करत आहे. यंदा त्याने १० गुंठे क्षेत्रात कलिंगड लागवड केली आहे. तिनं टप्प्यात केलेल्या लागवडीचा पहिल्या टप्प्यात तब्बल त्यानं ५०० किलोचे कलिंगड उत्पादन घेतले आहे. अजून दोन उत्पादने आहेत ती पुढच्या दोन महिन्यांत पूर्ण होतील असा विश्वास शुभमला आहे .
हे सर्व पिक घेत असताना तो रासायनिक खतांचा वापर न करता गांडूळ खत,वार्मी खत अशा नैसर्गिक खतांचा वापर करत आहे. शुभमने रस्त्यालगत घर असल्याने तिथेच स्टॉल उभारून तिथेच कलिंगड आणि भाजी विक्री सुरू केली आहेत्याच्या या प्रयत्नांना आई वडील आणि बहिणीने मोलाची साथ दिली आहे.आपल्याकडे कलिंगड आणि काकडी यांना मागणी खूप आहेत्यामुळे दररोज दोन हजार रुपयांहून अधिक किंमतीचे कलिंगड आणि भाजी विक्री होते. कृषीच्या शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी केला आणि स्वतःच्या मालकीची जमीन असल्याने ती लागवडीसाठी उपयुक्त असल्याने तीचा वापर करून घेतला आहे असे मत तरुण शेतकरी शुभम दोरखडे याने सांगितले.