पद्मश्री दादा इदाते यांच्या सन्मानार्थ १२ फेब्रुवारीला दापोलीत सायकल फेरी

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी: निस्वार्थपणे सामाजिक कार्यात सक्रिय, अनेक प्रतिष्ठेच्या पदांवर काम केलेले, अनेक सत्कार, पुरस्कारांनी सन्मानित कोकणचे रत्न आदरणीय श्री भिकू रामजी इदाते (दादा) यांना केंद्र सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दादांच्या या समाजकार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती रुपनगर- ऐश्वर्यनगर- श्रीगुरुनगर- लष्करवाडी जालगाव- गणेशनगर- आनंदनगर- उदयनगर- आझाद मैदान अशी ६ किमीची असेल. समारोप आझाद मैदान येथे ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान जालगाव आनंदनगर येथील दादांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन घेतले जाईल. तसेच त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यात येणार आहे.