सावंतवाडी । प्रतिनिधी : मळेवाड कोंडुरे उपसरपंच तथा पत्रकार हेमंत मराठे यांचे वडिल रमाकांत मराठे यांचे अलीकडेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी हेमंत मराठे यांच्या मळेवाड हेदुलवाडी येथील निवासस्थानी भेट देत मराठे कुटुंबियांचे सांत्वन केले. हेमंत मराठे व त्यांचे भाऊ श्रीप्रसाद मराठे यांना त्यांनी यावेळी धीर दिला.
यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते.

Sindhudurg












