न्हावेली | प्रतिनिधी : श्री गजानन महाराज मंदिर प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मळेवाड येथील मठात सोमवार १३ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
सोमवार १३ रोजी सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक आणि महापूजा , सकाळी ९.३० ते १२ वाजता रुद्रार्चन व शिवकवचानुषठान , व धार्मिक कार्यक्रम , दुपारी १२.३० ते १. वाजता महाराजांची महाआरती प्रकट समय , दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद , दुपारी २.३० ते ४ पर्यंत अक्षय नाईक प्रस्तुत ‘ स्वरअक्षय ‘ गायनाचा कार्यक्रम ,दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता गोवा केरी येथील भक्तिरस हा गायनाचा कार्यक्रम , सायंकाळी ६ ते ७ वाजता स्वराभिषेक साटेली यांचे भजन , रात्री १० वाजता ‘ ढ मंडळी कुडाळ यांची ‘ बिलीमारो एकांकीका त्यानंतर रात्री १० वाजता ‘ ढ मंडळी कुडाळ यांची ‘ वाल्मिकी एकांकीका होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गजानन महाराज सेवा मंडळाने केले आहे .