मुंबई : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सादर करण्याची त्यांना संधी मिळावी हे उद्दिष्ट समोर ठेवून दिनांक १ ते ३ फेब्रुवारी 2023 रोजी शाळेत वैशिष्ट्यपूर्ण अशा कलादालन /प्रदर्शन या सर्जनशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक अशा तीनही विभागात हे कलादालन यशस्वीपणे संपन्न झाले. विशेष गोष्ट अशी की प्राथमिक विभागातील सर्व म्हणजे ८४१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीयुक्त आनंददायी असा सहभाग दिला.प्राथमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका अनघा साळवी तसेच माजी मुख्याध्यापिका सुनिता कोळी यांच्या हस्ते प्राथमिक विभागातील कलादालनाचे उद्घाटन झाले. तर माध्यमिक विभागाच्या विविध दालनांचे उद्घाटन माजी मुख्याध्यापिका म्हापणकर, संस्थेचे विश्वस्त आदरणीय विलास कांबळे तसेच शिक्षण विभागाच्या सीआरसी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
अशा या आगळ्यावेगळ्या उपक्रमास शाळेच्या सन्माननीय संस्थापक तथा कार्यकारी विश्वस्ता श्रीमती मीनाताई शरद पाटील, विश्वस्त विलास कांबळे, विश्वस्त माननीय श्री महादेव कोळी, निमंत्रित सदस्य श्री महेंद्र भोईर व श्रीमती वंदना उतखेडे, रामचंद्र परुळेकर यांचे बहुमोल सहकार्य तसेच उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. विश्वस्तांच्या प्रोत्साहनामुळेच हे कलादालन यशस्वी होऊ शकले.पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्या श्रीमती हेमा परंडवाल, प्राथमिक विभागाच्या मुख्या गीता बांदेकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजेंद्र झोपे या सर्वांचे उत्कृष्ट नियोजन, मार्गदर्शन यामुळे यशस्वी झालेले हे कलादालन संस्मरणीय ठरले.महाराष्ट्र राज्य आयकर विभाग प्रमुख नितीन वाघमोडे, बृहन्मुंबई महानगरपालिका एम व एल विभाग निरीक्षिका भारती भवारी या सन्माननीय व्यक्तींनी उपस्थिती दिली.शाळेचे सर्व पालक, हितचिंतक, स्नेही, निमंत्रित सर्वांनी कलादालनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले..शाळेच्या या विशेष उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आपला लेखी अभिप्राय नोंदवला…