जालगाव येथे आज वाचक कट्ट्याचं आयोजन.!

दापोली प्रतिनिधी:-
महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा.काणे स्मारक समितीच्या वतीने जालगाव येथील महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा.काणे स्मारकामध्ये आज शनिवार 11 फेब्रुवारी रोजी वाचक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यापासून दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता या वाचक कट्ट्याचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे .आज दापोलीतालुक्यातील जालगांव, खेड कोमसाप व स्मारकाच्या संयुक्त विद्यमाने नगरवाचनालय खेड येथे आणि देवरुख येथे स्मारकाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता अशाच प्रकारचे वाचक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे .
वाचकांनी वृत्तपत्र ,कविता, लेख, कादंबरी ,मोबाईल वरील लेखांक ,ई बुक ,स्फुट किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केलेल्या वाचनावर आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध आहे.

या वाचक कट्ट्यावर जास्तीत जास्त वाचकांनी उपस्थित राहून आपल्या मनातील विचार व्यक्त करावेत असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.